सूतगिरणीच्या बनावट दस्तऐवज प्रकरणी आ.ठोंबरेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
केज // लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागसवर्गीय सहकारी सूतगिरणीचे कथित संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी केज न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
केज तालुक्यातील लाडेगाव येथील गणपती सोनाप्पा कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे कि, २०१५ साली आ. संगीता ठोंबरे यांनी स्वतः मुख्य प्रवर्तक होऊन नियोजित लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागसवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रस्तावित केली होती. आ. ठोंबरे आणि त्यांचे पती तथा सूतगिरणीचे अध्यक्ष विजयप्रकाश ठोंबरे यांनी गणपती कांबळे यांची पूर्वसंमती न घेता त्यांना अंधारात ठेऊन आणि त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांना सूतगिरणीच्या संचालकपदी नेमणूक केली. याच पद्धतीने या दांपत्याने सचिन भीमराव चव्हाण आणि अशोक गणपती कांबळे यांनाही सदस्य करून घेतले. या दस्तावेजांचा वापर करत नंतर शासकीय अनुदानाच्या रकमा उचलण्यात आल्या. आपले नाव संचालकपदी असल्याची माहिती मिळाल्यानंतर चकित झालेल्या गणपती कांबळे यांनी याबाबत आ. ठोंबरे यांच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीस त्यांनी टाळाटाळ केली, मात्र नंतर याबाबत विजयप्रकाश ठोंबरे यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार कांबळे यांनी विजयप्रकाश यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला काय करायचे ते आम्ही केले, तुला काय करायचे ते तू कर असे म्हणत कांबळे यांना हाकलून दिले. दरम्यान, या सूतगिरणीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर कांबळे यांनी दस्तावेज पहिले असता त्यांना त्यांच्या नावासमोर बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर गैर व्यवहारात आ. ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या सह्या करून शासनाची व जनतेची फसवणूक केली, तसेच सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून आपणास नाहक गोवण्यात आले आहे अशी तक्रार घेऊन गणपती कांबळे यांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयात दाद मागितली. पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा आश्विनी पवार या फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडला आहे. याप्रकरणी आ. संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्या वर ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमा नुसार बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल करून चौकशी करून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती फिर्यादीचे वकील ॲड. संतोष मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी आ. ठोंबरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.
विवेक सिंधु न्यूज

Social Plugin