मुंबई: केंद्र सरकारने आणलेल्या नव्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्याला सर्व स्तरातून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात या कायद्याला तूर्तास स्थगिती दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन या कायद्याला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन मोटार परिवहन कायद्याला राज्यात तूर्तास स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं. या नव्या कायद्याबाबत केंद्र सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली
Social Plugin