अंबाजोगाई // आपल्या अंगात जिद्द असल्यास कोणतीही गोष्ट निश्चित यशस्वी होते पण त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न व्हायला हवेत याचेच उदाहरण म्हणजे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहिम होय असे मत भुमीपुत्र नंदकुमार जगताप यांनी व्यक्त केले
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या उद्घाटन पर व्याख्यानात ते बोलत होते
व्यासपीठावर यो. शि. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. एस.टी. कराड होते
व्याख्यानात ते म्हणाले की, २००७ साली आमच्या समुहाने एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठीची मोहिम सन २००७ मे मध्ये स्विकारली आणि भारताचा तिरंगा फडकवुन ती यशस्वीही केली त्या अनोख्या थरारक अनुभवातून संकटांना पार करीत ही मोहिम फत्ते झाली या मोहिमेत जवळपास ११ जणांचा सहभाग होता मोहिम यशस्वी झाल्यानंतर सबंध देशभरात स्वागत, अभिनंदन करण्यात आले आजही ते क्षण जीवनात आनंददायीच आहेत कोणत्याही क्षेत्रात उंचावर जायचे असल्यास मेहनत, परीश्रम, प्रयत्न असे गुण आवश्यक असतात ते गुण जोपासल्यासच आपले स्वप्न पुर्ण होते असेही ते म्हणाले प्रारंभी जगताप यांचे स्वागत यो. शि. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. एस.टी. कराड,प्राचार्य यु.डी. जोशी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कदम यांनी तर संचलन, आभार प्रा. गणेश पिगंळे यांनी मानले
यावेळी यो. शि. संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, निमंत्रित मोठया संख्येने उपस्थित होते

Social Plugin