अंबाजोगाई // भावनांवर विचारांचा प्रभाव असतो भावना बदलल्यास विचारही बदलतात असे जरी असले तरी विवेक जागृत आणि यंमत ठेवल्यास विवेकधिष्ठीत समाजाची निर्मिती होते असे मत वक्ते विनायक सावळे यांनी व्यक्त केले.
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यान मालेत आयोजित व्याख्यान मालेत ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक अॅड.यु.बी.कामखेडकर उपस्थित होते. पुढे बोलताना सावळे म्हणाले की, सकारात्मक विचार प्रेम, वात्सल्य, करूना अशा गोष्टींचा समावेश भावनेत असतो भावना ही विचारांवर प्रभुत्व गाजवते भावना आणि विचार यावर मुळ मानवी स्वभावाचा प्रभाव असतो त्यातूनच व्यक्तीमत्व विकास होतो. राग, द्वेष, मत्सर अशा काही गोष्टी आपल्या मुळ स्वभावातून काढल्या तर व्यक्तीमत्व उंची गाठते त्यातूनच आपला विकास होतो. प्रामुख्याने शांत राहून योग्य निर्णय घेतल्यास अनेक बाबी पुर्ततेकडे जातात हे सुत्र आहे. या सुत्रास अनुसरून मानवी जीवन अवलंबुन आहे. यावर नियंत्रण मिळविणे देखील कठीन असते परंतु सकारात्मक विचारांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी घडू शकतात असे ते म्हणाले. प्रारंभी सावळे यांचे स्वागत अॅड.यु.बी.कामखेडकर, उपमुख्याध्यापिका अलका सोळंके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हेमंत धानोरकर यांनी करून दिला. संचलन व उपस्थितांचे आभार देशमुख यांनी मानले. यावेळी संस्था पदाधिकारी, संचालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin