Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खूशखबर ! तुमचा ..तुमच्या.. मुलांच्या विवेकी व्यक्तीमत्वचा विकास कसा करायचा याविषयावर मार्गदर्शन पाहिजे तर..मग चला .


अंबाजोगाई // सोशल मीडियामुळे व्यक्तीमत्व विकास व अनुभवाच्या कक्षा रुंदवल्याआहेत. आपण जे अनुभव घेतलेले नाहीत ते अनुभव बघण्याची, वाचण्याची, समजून घेण्याची संधी सोशल मीडियामुळे मिळते आहे. यामाध्यमातून आज विवेकी व्यक्तीमत्वचा विकास कसा करायचा  याविषयावर नामवंत विचारवंत विनायक सावळे यांचे मार्गदर्शन व परिसंवाद होणार आहे .

येथील योगेश्वरी शिक्षण संस्थामध्ये सर्व  कर्मचारी बांधवांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त " श्रीगणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे राहणार आहेत .या व्याख्यानमालेत नामवंत विचारवंत विनायक सावळे यांचे  व्याख्यान  होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे व सचिव गणपत व्यास यांनी दिली आहे .नागापूरकर सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता व्याख्यानामालेला सुरुवात होईल .
नागरिकांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे .