▪ लातूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; टँकरद्वारे प्रति कुटुंब फक्त २०० लिटर पाणी मिळणार
अंबाजोगाई // शहरासह बीड- लातुर -उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा येत्या १ आँक्टोबर पासून बंद करण्याचा निर्णय मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिका-यांची विशेष बैठक घेवून तशा सुचनाही दिल्या आहेत.
मांजरा धरणातुन बीड-लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील आनेक गावांना गेली अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षापासून मांजरा धरणातील पाणी साठा शुन्य पातळीच्या खालीच असूनही आजपर्यंत या धरणातुन लातुर, अंबाजोगाई सारख्या मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी या धरणक्षेत्रात पावसाळा संपत आला तरी पाण्याचा एक टीपुसही जमा न झाल्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या सर्वच पाणी पुरवठा अडचणीत आल्या आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणारे लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातुर जिल्हाधिकारी कार्यालयात १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता या धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व नगर परीषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्या प्रमुख अधिका-यांची एक तातडीची बैठक बोलावून या धरणातील पाणी पुढील काळात या विभागातील नागरिकांना पुरवण्यासाठी या धरणावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा याजनेचा पाणी पुरवठा येत्या १ आँक्टोबर पासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असून यापुढे प्रति घर फक्त २०० लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येईल, त्यादृष्टीने सर्व अधिका-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात नियोजन करावे असे आदेशीत केले आहे.
अंबाजोगाई न.प.चे मुख्याधिकारी जगताप बैठकीस हजर :
१६ सप्टेंबर रोजी मांजरा धरणातील पाणी नियोजना साठी लातुरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी बोलावलेल्या या महत्वपुर्ण बैठकीस अंबाजोगाई नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप हे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार उपस्थित होते. त्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून या पध्दतीचे नियोजन करण्यासाठी नगर परीषदेची स्वतंत्र बैठक घेण्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
अंबाजोगाईची भिस्त काळवटी साठलण तलावावर :
अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मांजरा धरणासोबतच काळवीट साठवण तलावाचाही मोठा असून या साठवण तलावातील पाणी गेली अनेक दिवसांपासून पिण्यासाठी आरक्षित करुन ठेवले आहे. येत्या कांही दिवसात समाधान कारक पाऊस झाला आणि काळवीट साठवण तलावातील पाणी पातळीत वाढ झाली तर शहरातील पाणी टंचाई नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल असा विश्वास राजकिशोर मोदी यांनी दिला.
विवेक सिंधु न्यूज
Social Plugin