Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपींना घेतले ताब्यात ..'ही' ...हत्या प्रेमप्रकरणातून झाली.






परळी// परळीत पोलीस ठाणे जवळच सापडला  मृतदेह ,मयताचे नाव अनिल हालगे असे आहे  .परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या कबरस्थानात रक्ताच्या थारोळ्यात सापडला .


गणेशपार भागातील रहिवासी असलेले अनिल बस्वेश्वर हालगे वय 22 वर्ष या तरुणाचा आज सकाळी खून झाला .

पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतले व आरोपींना कसुन चौकशी केली असता आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच खूनात वापरलेले दगड, ब्लेड व तुकडे केलेला मयताचा मोबाईल पोलिसांना दिला .

परळी शहर पोलीस स्टेशनच्या सह पोलीस निरीक्षक धस मॕडम यांनी या प्रकरणात थोडाही विलंब न करता अवघ्या पाच तासात आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन आहे

परळी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.द.वि. 302 ,34 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.