Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धोकादायक ! क्रेडिट कार्ड वरील CCV नंबर यासंबंधित तुम्ही माहिती अनोळखीना शेअर करताय ..तर जर सावधान..

मुंबई // पडताळणी करुन मगच तुमच्या बँक अकाऊंटचा तपशील द्या. अनेक लोकांना क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स पॉइंट रिडीम करण्यासंबंधित मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ३२ वर्षीय भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लोकांची फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीचे नाव विकास झा आहे. त्यांच्याकडून अनेकांना गंडा घालण्यासाठी क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स घेण्यासंबंधित मेसेज पाठवण्यात येत होते. ज्यातून त्याला लोकांचे बँक डिटेल्स चोरता येत होते. झा हा याआधी एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करायचा. आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याने नोकरी सोडली. ज्यावेळी व्यवसायात त्याला अपयश यायला लागले तेव्हा त्याने लोकांना फसवण्याचा धंदा सुरु केला.

@असा मेसेज आल्यास सावधान
काही सिम कार्ड वेंडर्सला जोडीला घेऊन असे काम करण्यास सुरुवात केली होती, यासाठी त्यांने लोकांना पाठवण्यासाठी मेसेज तयार केला होता. त्या लिहिले होते की, तुमच्या क्रेडिट कार्डवर खूप जास्त रिवॉर्ड्स पॉइंट्स तयार झाले आहेत. यांचा उपयोग तुम्ही कॅशबॅक ऑफर्स किंवा सवलती मिळवण्यासाठी करु शकता. रिवॉर्ड पॉइंट्स संपवण्यासाठी एसएमएस मध्ये दिलेल्या लिंकलर क्लिक करा आणि एक अर्ज भरा, या लिंकवर क्लिक करताच kotekcardredeem.com या बनावट वेबसाइटवर लोक पोहचत असत.

लोकांची माहिती, क्रेडिट कार्ड वरील CCV नंबर यासंबंधित तो ही माहिती लोकांकडून काढून घेत असत, अशा प्रकारे ई-वॉलेट्सचा वापर करुन विकास झा याने आपल्या साथीदारांसह लोकांना फसवले होते. पोलिसांनी या चोरट्यांकडून ४- ५ लाख रुपये रोख रक्कम, ९ मोबाइल फोन, एक लॅपटॉप, एक राऊटर आणि ४० सिम कार्ड जप्त केले.