Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking ! बीडचा पाणी प्रश्न मार्गी लागला परळीकरांचे दुष्काळाचे संकट ...कायम राहणार काय ? यंञाणा थंडगार का ?




२४ तासात जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचणार...

बीड //नाशिक विभागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाणीसाठा ७० टक्क्यांच्यावर पोहंचला  आहे.
हाच धागा पकडून बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री दिपक सावंत यांच्याकडे जायकवाडी धरणातून ३ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  दुपारी जायकवाडी धरणात ७०% पेक्षा जास्त जलसाठा झाल्याने माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान दुपारी दोन वाजता धरण अभियंता बुध्दभूषण दाभाडे, आर ई चक्रे आदीच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उजव्या कालव्याचे दरवाजे वर उचलून कालव्यात ४०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले. कालव्यातील विसर्ग टप्याटप्याने वाढवून तो जास्तीत जास्त ९०० क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल असे दाभाडे यांनी सांगितले. माजलगाव साठी पहिल्या टप्प्यात ७५ दलघमी पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

 याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही मागणी लावून धरली. याला बैठकीत मंजुरी मिळाली. यानंतर आज दुपारी जायकवाडीतून ४०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग करण्यात आला. दरम्यान, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा दुपारी ४ वाजेपर्यंत ७१.१० टक्के झाला होता. जायकवाडी धरणात वरील धरणातून पाण्याची आवक सुरूच आहे. सद्या 71 हजार 335 क्यूसेसने गोदावरीमार्गे जायकवाडीत पाणी येत आहे. धरणाची पाणी पातळी पाहता यावेळी मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट टळले आहे .

जायकवाडी धरणात जलसाठा ७३% होत आल्याने आज माजलगाव धरणासाठी जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले. पैठण ते माजलगाव धरणाचे अंतर १३२ किमी असून जायकवाडीचे पाणी माजलगाव धरणात पोहचण्यासाठी २४ तासाचा कालावधी लागेल असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.