Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका जखमी बिबट्याचे फोटो काढण्याचे धाडस एका व्यक्तीच्याच अंगाशी आले.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



httpsघटना कुठली असो  ,आपल्या मोबाईल मध्ये  सोशल मीडियावर  पहिल्यांदा टाकण्यासाठी  अनेकांची   धडपड सुरू असते .त्यांनी थोडं थांबायला हवा  दिसली घटना  ..मोबाईल मध्ये   घे फोटो घे व्हिडिओ  हे  कधीकधी अंगलट येतं  अशीच घटना जखमी बिबट्याचा फोटो काढण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तीवर चवताळलेल्या बिबट्याने झडप घातली. चवताळलेल्या बिबट्याने अचानक झपड घातल्याने बिबट्याला पाहायला आलेल्यांची पळता भुई थोडी झाली. लोक सैरावैरा पळत असताना बिबट्याने एका व्यक्तीला पकडून त्याचे लचके तोडले. घाबरलेल्या व्यक्तीने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला.

एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जखमी झालेला एक बिबट्या रस्त्याच्या कडेला पडलेला दिसत आहे. त्याचा फोटो काढण्यासाठी एक व्यक्ती त्याच्या जवळ जाऊन फोटो काढताना व्हिडिओत दिसत आहे. अचानक बिबट्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर झेप घेतो आणि त्याला खेचत नेतो. परंतु जखमी असल्याने तो त्या व्यक्तीला अधिक दूर नेऊ शकत नाही. सुदैवाने तो व्यक्ती यातून बचावतो. मात्र, बिबट्याच्या नख्या आणि दात लागल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.