Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वेच्या डब्यात शाळा भरते ! ऐकून थोडे नवल वाटेल परंतु हे खरे आहे......




अंबाजोगाई // रेल्वेच्या डब्यात शाळा भरते ऐकून थोडे आश्चर्य वाटेल खरे आहे. शाळेतील मुलांचा गुणवत्तापूर्ण विकास आणि शाळेत भौतिक सुविधा देण्यात आघाडी घेऊन, शिक्षक, विद्यार्थी आणि लोकसहभागातून शाळेचा सर्वागीण विकास घडवला आहे .

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात साकुड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक शिक्षक व पालकांनी मिळून ही किमया साधली आहे. रंगरंगोटी करून रेल्वेचे डबे तयार केल्याने तसेच शाळेत आकर्षक  निसर्गातील जंगलातील प्राणी नयनरम्य चित्र काढून विविध रंगाच्या सुबक कलाकृती करून  रेल्वेच्या डब्यात शाळा हा विद्यार्थ्यांनासाठी एक आगळा वेगळा अनुभव आहे .

रेल्वेच्या प्रतिक्षेतील बीडकरांना ही एक भेटच म्हणावे लागेल .कारण यारुपाने का असेना  रेल्वेत बसण्याचा आनंद अनुभव विद्यार्थीना मिळतो आहे .असे अनेक उपक्रम याशाळेत हसत खेळत होतात .