Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका क्लिकवर मिळणार मदत ...! एकात्मिक अॅपव्दारा !! रेल्वे प्रवाशांना प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणारे अॕप..सज्ज .



मुंबई //तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणारे अॅप अखेर प्रवासी वापरासाठी सज्ज झाले आहे. रिअल टाइममध्ये सुरक्षा, हाताळण्यास सोपे, सुरक्षा यंत्रणांचा समावेश या तीन वैशिष्ट्यांच्या आधारे हे सुरक्षा अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपमध्ये आरपीएफचा १८२ हा टोल फ्री क्रमांकही जोडण्यात आल्याने प्रवाशांना एका क्लिकवर मदत मिळणे शक्य होईल. रेल्वे मंडळाच्या मंजुरीनंतर अॅपच्या लोकार्पणाची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते.

रेल्वे सुरक्षा मंडळाचे महासंचालक अरुण कुमार यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांसाठी एकात्मिक अॅप सुरू करण्यात येण्याची घोषणा केली होती. मध्य-पश्चिम रेल्वे प्रवाशांसह देशभरातील प्रवासी सुरक्षेसाठी एकाच अॅपचे काम सुरू असल्याची माहिती कुमार यांनी दिली होती. दरम्यान रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) समावेशासाठी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जयजीत सिंग यांच्यासमोर अॅपचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर त्यांनी देखील जीआरपीच्या अॅपमध्ये समावेशाला मंजुरी दिल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.

@पॅनिक बटण असणार..

महिला आणि दिव्यांग प्रवाशांची सुरक्षा, राखीव डब्यातील घुसखोरी, डब्यात फेरीवाल्यांसह गर्दुल्ल्यांचा वावर या आणि अन्य प्रवासी समस्यांना आळा घालण्यासाठी अॅपमध्ये पॅनिक बटणाची सुविधा असेल. पॅनिक बटण दाबल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना मिळेल. नियंत्रण कक्षातून लोकलच्या ठिकाणाची माहिती घेऊन पुढील स्थानकांवरील ड्युटीवर असलेल्या आरपीएफ किंवा जीआरपीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना करून संबंधित प्रवाशाला तातडीने मदत मिळणे शक्य होईल.