Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रिही असेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी





मुंबई  // , ''फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानमधून भारतात आले. मात्र  त्यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या निर्वासितांना अद्याप मताधिकार मिळालेला नाही. आज या संबोधनामधून मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करून इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रिही असेल. तसेच येथील जनता पूर्वीप्रमाणेच आपले आमदार निवडून देऊ शकतील. जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना पूर्ण पारदर्शकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. तसेच लवकरच येथे निवडणुका होतील, अशी माहिती मोदींनी दिली.केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५अ हटवण्याबाबत घेतेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असला तरी येथे विधानसभा असेल. तसेच काश्मिरी जनतेला आधीप्रमाणेच आपले लोकप्रतिनिधी निवडता येतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

 यावेळी  मोदींनी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यामागचे कारण सांगितले. आज देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जम्मू काश्मीरला केंद्र सरकारच्या अखत्यारित ठेवण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. काही काळापूर्वी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जम्मू काश्मीरसाठी आखलेल्या कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या आहेत. प्रशासनामध्ये गतिशिलता आली आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांना गती मिळाली आहे. विशेषकरून रस्तेबांधणी, रेल्वेसारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत