Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक प्रकार..! डॉक्टरांच्या निष्काळीजीपणा, प्रसुती दरम्यान महिलेच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याने बाळांपणानंतर तीन दिवसातच महिलेचा मृत्यू झाला.



औरंगाबाद//  एका वीस वर्षींय महिलेच्या सिझेरियन झाल्यानंतर कापसाचा गोळा पोटात राहिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकारानंतर संबंधित डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात आले.गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, यात प्रसुती दरम्यान महिलेल्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याने बाळांपणानंतर तीन दिवसातच महिलेचा मृत्यू झाला.

पोस्टमार्टेममध्ये महिलेच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचा रिपोर्ट आला. यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळीजीपणाचा केल्याचा आरोप केला. तनुश्री तुपे यांचे सिझेरियन झाल्यानंतर तीन दिवसानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांचे २८ जुलैला निधन झाले. या महिलेला मुलगा झाला होता.