Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी रस्त्यावर अपघात ...! बस व मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू





वडवणी // .शुक्रवार दि २ रोजी दुपारी एकच्या सुमारास ब्रमनाथ तांडाजवळ  बस व मोटारसायकलची खडा चुकवता चुकवता समोरच्या समोर धडक झाल्याने मोटारसायकलस्वार प्रकाश उत्तम सानप रा. गोविंदवाडी यांचा जागीच मृत्यू झाला.

परळी रोडवर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यामुळेही अपघाताची मालिका सुरूच आहे . हा रस्ता म्हणजे मृत्युचा सापळाच बनला आहे.या सदरील प्रशासकीय यंत्रणा यागंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचे जनतेतुन बोलले जात आहे. दर १५ दिवसांत एक  असे अपघात या मार्गावर होत आहेत. रस्त्यावर  पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ब्रमनाथ तांडाजवळ  बस तेलगावहून वडवणीकडे येत असताना वडवणीकडुन जाणाऱ्या मोटारसायकलला धडकली. यात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. वडवणी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. पुढील तपास ए पी आय खाडे करत आहेत.