Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

"एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठी" भयावह संकटातून मार्गक्रमण करत असलेल्या नागरिकांना गरज आहे ती " माणुसकीच्या आधाराची " -डॉ .अमोल कोल्हे





नारायणगाव //आज कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील पुरसदृश्य परस्थिती पाहताना काळजाला खूप मोठी ठेस पोहचते, या महाप्रलयी पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच भाग , गावे, शहरे तुडुंब पाण्याखाली गेली असून तिथे सध्या काय परिस्थिती असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतोय ना जेवणासाठी अन्न , ना राहण्यासाठी घर सगळं काही उध्वस्त झाला असून अश्या या भयावह संकटातून मार्गक्रमण करत असलेल्या नागरिकांना गरज आहे ती
" माणुसकीच्या आधाराची "
हाच संदेश जगाला देत , कोणतीही कृती करायला सांगण्या आगोदर कृती मात्र स्वतः करावी याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ .अमोल कोल्हे
 

    आज परिस्थितीत राजे असते तर... परिस्थितीत  खऱ्या अर्थाने ...आज एक अभिनेता राजे संभाजी राजे शिवाजी यांच्या भूमिकांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे डॉक्टर कोल्हे यांनी आज दाखवून दिले ...  डॉ . कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ' शिवस्वराज्य ' यात्रेस काल त्यांनी बागलाण येथील सभेमध्ये  स्थगिती दिली आणि आज सकाळी आपल्या नारायणगावात दाखल झाले आणि आपल्या मतदारसंघातील लोकांना आवाहन केले की "एक भाकरी पूरग्रस्त बांधवांसाठी" अश्या मथळ्याखाली आपल्या सोशलमाध्यमातून आवाहन केले आणि त्या आवाहनास जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.
     "अस म्हणतातना कोणत्याही कार्याची सुरुवात स्वतापासून केली
तरच ते कार्य सिद्धीस जात " आपल्या उपक्रमाची सुरवात त्यांनी घरापासून केली डॉ अमोल कोल्हे यांचे निवासस्थान असलेल्या कोल्हेमळ्यात सर्व माता-भगिणी एकत्र येऊन भाकरी थापण्यास सुरवात झाली.
     डॉ अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सांगत नाहीत तर ते स्वताच्या आयुष्यात तसे वागतात याचा प्रत्यय आज आला , नुसतं बोलण्यापेक्षा किंवा आवाहन करण्यापेक्षा आयुष्यात कृती महत्वाची असते.