Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ब्रेकिंग न्यूज ! नांदेड बेंगलोर एक्सप्रेस परळी रेल्वे स्टेशनवरुन 10 किलोमीटर अंतरावर गेली असता रिव्हर्स आली का? तर ....

परळी //नेहमीच चर्चात असणारे परळी रेल्वे स्टेशन वर आज परत एका घटनेने चर्चात आले.नांदेड बेंगलोर एक्सप्रेस आपल्या वेळेवर परळी स्टेशन फ्लॅट क्रमांक एक वरून निर्धारित वेळ  रवाना झाली होती .परंतु काही क्षणात परळी पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर बेंगलोर रेल्वे या रेल्वेचा रेल्वे इंजिन फेल झाल्याने परळी रेल्वे स्टेशन प्लेटफार्म  क्रमांक दोन वर रीव्हसर्स ट्रेन आणण्यात आलीची प्राथमिक 
माहिती आहे . स्थानक प्लॅटफॉर्मक्रमांक 3 वर नांदेड- बेंगलोर ही रेल्वे गाडी आली आणि सकाळी ८.४० वाजता सुटली. दहा किलोमीटरच्या अंतरावर घाटनांदूर मार्गाने धावत असताना इंजिन अचानक बंद पडले. त्यानंतर रेल्वे परळी रेल्वे स्टेशनवर परत आणण्यात आली. येथे दुसरे इंजिन लावून ही  रेल्वे ११. ३० वाजेच्या दरम्यान पुन्हा रवाना करण्यात आली. 

दरम्यान, रेल्वे इंजिनच्या तपासणीसाठी  सिकंदराबाद विभागाचे  कर्मचाऱ्यांचे कार्यालय  परळी रेल्वे स्टेशन येथे आहे. या विभागाचे कर्मचारी फक्त टायर चेक करतात. रेल्वे इंजिन पूर्ण तपासत नाहीत अशी चर्चा प्रवास्यांमध्ये ऐकावयास मिळाली. तसेच यात चूक कोणाची, इंजिनमध्ये बिघाड का झाला, रेल्वे रिव्हर्स आणण्याचे  खरे कारण काय, याबाबतीत रेल्वेचे अधिकारी स्पष्टीकरण द्यावे असे अनके प्रश्न यावेळी प्रवाश्यांनी उपस्थित केले.