Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एका विमानाच्या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन पायलटसह ५ जवानांचा समावेश..!



 दिल्ली // पाकिस्तानी सैन्याचे एक विमान नेहमीच्या सरावादरम्यान रावळपिंडी शहराजवळ कोसळले. या भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन पायलटसह ५ पाकिस्तानी जवानांचा समावेश आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाजवळ हि दुर्घटना घडल्याने तात्काळ मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु केले आहे. त्याचबरोबर जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हि घटना नेमकी कशामुळे घडली याचा अद्याप खुलासा झाला नसून या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानाने सरावासाठी उड्डाण केले असता काही मिनिटांतच दाट लोकवस्ती असलेल्या भागात ते कोसळले. पाकिस्तानी लष्कराने या घटनेविषयी खुलासा करताना सांगितलं कि, या घटनेची दाहकता बघता रावळपिंडीच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले असून रात्रीची वेळ असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता.