Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'ताई महोत्सव ! माणसाने भौतिक सुखाच्या मागे न लागता , समाधानी जीवन जगावे- डॉ संजय कळमकर.


परळी // ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी भाजपाच्या वतीने "ताई महोत्सव" अंतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून,त्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी "जगणे सुंदर व्हावे" या आपल्या व्याख्यानात जेष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ संजय कळमकर यांनी आपल्या व्यापक अशा भाषणात जीवनातील चढ उतार व प्रसंगावर आपल्या खास विनोदी शैलीत व्याख्यान केले, त्या प्रसंगी माणसाने जीवनात भौतिक सुखाच्या मागे न लागता आहे त्या परिस्थितीत समाधानी जीवन जगावे असे मत त्यांनी व्यक्त केले. लोकनेते गोपीनाथ मुंडे नागराज रंग मंदिरात "ताई महोत्सव" अंतर्गत झालेल्या पहिल्या पुष्पाच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जेष्ठ नेते दत्तापा ईटके गुरुंजी होते तर कार्यक्रमाचे उदघाटन वैद्यनाथ बँकेचे संचालक तथा भाजपा जेष्ठनेते विकासराव डुबे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कर्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा चे शहाराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर ,वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोकसेठ जैन,बाल हक्क आयोगाच्या डॉ शालिनीताई कराड,वैद्यनाथ बँकेचे संचालक दासू वाघमारे,प्रकाश जोशी,अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय नेते शेख अब्दुल करीम, वहाज मुल्ला,नगरसेवक प्रा पवन मुंडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते डॉ संजय कळमकर यांनी आपल्या खुमासदार व विनोदी शैलीतून मार्गदर्शन करून परळीकरांचे मने जिंकली,आपल्या मनोगतात डॉ कळमकर यांनी मानवी जीवनात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात प्रत्येकाचे वर्तन हे ज्याच्या-त्याच्या स्वभावानुसार असते मात्र वर्तनातले बारकावे शोधून जीवनाचा आनंद कोठे शोधता येईल याचा प्रत्येक व्यक्तीने विचार करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले त्याच बरोबर पुर्वी च्या जुन्या काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत मानवी जीवनात किती स्थित्यंतरे आली व किती बदल झाले, मोबाइल व टीव्ही सारख्या भौतिक सोयी सुविधा पुरवणाऱ्या वस्तुंचे मानवी जीवनातील फायदे व तोटे त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीतून सांगितले.या प्रसंगी आपल्या "लग्न सोहळा " या कथेतून लग्नातील वधू-वरांकडील मंडळी व पाहुणे यांच्या वर्तन व  संवादातील विनोदी गोष्टी सांगून प्रेक्षकांची मने तर जिंकलीच पण शेवटी प्रत्येक  वधुचा पिता जो असतो त्याची जीवाची घालमेल व  अवस्था कशी असते हे सांगून लोकांच्या डोळ्यात अश्रू ही आणले व मनातील भावनिक ओलावा ही जागा केला शेवटी आपल्या कडे जे आहे त्यात समाधान मानून जीवनाचा आनंद घ्या असे विचार मांडून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन शेखर फुटके सर यांनी यांनी केले,प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशांत कराड यांनी दिला तर आभार प्रदर्शन अश्विन मोगरकर यांनी मांडले,या कार्यक्रमाला शहरातील अनेक साहित्य रसिक लोकांनी हजेरी लावली, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द टर्निंग पॉईंट व भाजपा युवामोर्चा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.