Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नौकरी शोधाताय ! बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नौकरी मेळाव्याचा चलचित्ररथाद्वारे प्रचार!


परळी //  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधीमंडळ गटनेते अजित पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून रविवार दिनांक 28 जुलै रोजी आयोजीत केलेल्या नोकरी मेळाव्याच्या  (LED ) प्रचारवाहनाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे युवक नेते जि.प.सदस्य अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. अधिकाधिक बेरोजगारांना या मेळाव्याचा  लाभ होईल असे यावेळी त्यांनी सांगितले.
         परळी मतदार संघातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून दररोज सकाळी 10 ते 5 लोकनेते नटराज रंग मंदिर मध्ये नाव नोंदणी सुरू आहे.राज्यातील 30 नामवंत कंपन्या या नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत आणि जागेवरच कॅम्पस मुलाखती द्वारे निवड करुन स्वीकृती आदेश देणार आहेत. या मेळाव्यात नोंदणी व आवश्यक माहिती चलचित्ररथाद्वारे दिली जात आहे. या चलचित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले.
       यावेळी युवकनेते अजय मुंडे,मोहन सोळके,बाजीराव धर्माधिकारी, अय्युब पठाण,सुरेश टाक, जाबेर खान पठाण,केशव बळवंत,रजाक कच्छी,अनंत ईंगळे,महादेव रोडे,श्रीकृष्ण कराड,गोपाळ आंधळे,विजय भोयटे,शंकर आडेपावर,जयप्रकाश लड्डा,अझिझ कच्छी,दत्ताभाऊ सावंत,रघुनंदन खरात,सुनील चव्हाण,जमिल अध्यक्ष,अजय जोशी,मनजीत सुगरे,दिनेश गजमल,सतीश काळे,शेख मुख्तार,अन्नपूर्णा जाधव,अर्चना रोडे,पल्लवी भोयटे, के.डी.उपाडे, सुभाष वाघमारे,रवी मूळे, बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे,मंगेश मुंडे,लाला खान पठाण, शंकर कापसे,चंद्रप्रकाश हालगे,शकील कच्छी, रंगनाथ सावजी,सचिन मराठे,अमोल वाळके,शरद कावरे,माऊली होलबे,सय्यद फेरोज,शेख शम्मो,शामसुंदर दासूद, श्रीहरी कवडेकर एस.के.गित्ते एस.व्ही.शेप,जितेंद्र नव्हाडे,श्रीपाद पाठकसुरेश नानावटे, रामदास कराडप्रताप समीनदरसवळे,राज जगतकर, बबलू साळवे,वैजनाथ जोशी,सुरेश भातागळे, अमर ताटे,तौफिक कच्छी,आरगडे सर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.