Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पिण्याच्या पाण्यासाठी परळीकरांचा एल्गार ! खडका बंधा-यातुन पाणी द्या अन्यथा; 27 जुलै पासुन उपोषण -दिपक देशमुख


परळी // दुष्काळ आणि  पिण्याच्या पाण्याची समस्यांवर शासनाचे व नगर परिषदेचे चालु असलेले टँकर हे चाँदापूर धरणातुन पाणी उपसा करून परळी  शहराला पुरवली जात आहे. पण ते पाणी पिण्या योग्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी परळीकर ञासले  आहेत.

या आधी नगर परिषदेने व काही लोक प्रतिनिधीने मा. जिल्हाधिकारी,
बीड यांना लेखी व तोंडी खडका धरणातील पाणी  संदर्भात  येथून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे  तसेच  नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. सदर याचीकेचा निकाल देण्यात आला. त्यात मा. जिल्हाधिकारी साहेबानी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे न्यायालयाने सुचविले असतांना
अद्याप पर्यत कठलीही कार्यवाही झाली नसून लवकरात लवकर परळी शहराला खड़का धरणातून  किंवा बोरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा दिनांक २७-०७-२०१९ रोजी तहसील कार्यालय, परळी येथे शहरातील नागरीकांसमवेत बेमुदत उपोषणास बसणार ...  असे निवेदन माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.