Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

IRCTC वरुन रेल्वेच तिकीट ‘बुक’ करतायं, हा नियम ‘नक्की’ माहिती करून घ्या


मुंबई // आज देखील प्रवास करण्यासाठी लोक रेल्वेलाच प्राथमिकता देतात. आता ऑनलाइन तिकिट बुक करताना काळजी घ्या. कारण   रेल्वेने ऑनलाइन तिकिट उपलब्ध करुन दिल्याने त्याचा ग्राहकांना देखील फायदा होताना दिसत आहे. त्यासाठी IRCTC च्या वेबसाइटचा लाभ अनेक जण घेतात. परंतू  पुन्हा लॉगिन करा
आता मात्र, रेल्वे प्रवाशांना IRCTC वरुन तिकिट बुक करताना जरा काळजी घ्यावी लागणार आहे, कारण IRCTC ने आपल्या नियमात काही बदल केले आहेत. यापुढे एक यूजर लॉगिन केल्यानंतर सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत फक्त एकदाच बुकींग करु शकतो ज्यात रिटर्न तिकिटाचा देखील समावेश असेल. जर तुम्हाला पुन्हा एकदा दुसरे तिकिट पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला लॉग आऊट करावे लागेल आणि त्यानंतर पुन्हा लॉगिन केल्यानंतर तुम्हाला दुसरे तिकिट बुक करता येऊ शकते.

बदललेल्या नियमानुसार –
@एका युजर आयडीवरुन सकाळी ८ ते १० च्या मध्ये फक्त २ तिकिट बुक केले जाऊ शकतात.

@सकाळी १० ते १२ यादरम्यान तात्काळ तिकिट बुक केली जाऊ शकते.

@एका युजर आयडीवरुन एका महिन्यात जास्तीत जास्त ६ तिकिट बुक करता येतील.

@ युजरचे आधार कार्ड लिंक असल्यास एका महिन्यात १२ तिकिट बुक करता येतील.

@ तिकिट विंडो उघडल्यानंतर ३० मिनिटांपर्यत ITCTC एजेंट तिकिट बुक करु शकत नाही.