Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सावधान !परळीत पाणीप्रश्न गंभीर !! शहराला नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा आता बंद होणार.. .



 परळी // परळी शहरासह तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारे नागापूर येथील वाण धरण आता कोरडेठाक पडले आहे

 पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडल्याशिवाय शहराला पाणीपुरवठा शक्य नाही. परळी शहराला नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा आता बंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाची  क्षमता १९.७१ द.ल.घ.मी.एवढी आहे. आता या प्रकल्पात टक्काभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही. परळीकरांसाठी काळ खडतर आहे. शहरात पाणीकपात नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली होती. आता वाण प्रकल्प कोरडा पडल्याने शहरासाठी पाणी पुरवठा टँकरने होणार आहे.
परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱा वाण प्रकल्प कोरडा पडल्याने आजपासून शासकीय योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. मोठा पाऊस पडेपर्यंत आता वाण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाऊ शकणार नाही. शहराला आता टँकरने पाणी पुरवले जाणार असून त्याचा सुयोग्य वापर नागरिकांनी करावा असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.