Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ब्रेकिंग न्यूज़ ..! भूकंपाचे सौम्य धक्के अनेक गावात भितीचे वातावरण ...




किनवट// पंधरा वर्षानंतर जमिनीखालच्या पाण्याची पातळी संपूर्णतः ढासळली असून सध्या जमिनीत दाहकता असून पर्यावरणाचा होत असलेला रास या भूकंपास कारणीभूत ठरत आहे नुकतेच खालील ठिकाणी भूकंपचे सौम्य धक्के बसल्याने येथील जनजीवन काही काळ का होईना विस्कळीत झाले होते.

@ नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के..
भुकंपाचा केंद्र बिंदू किनवट तालुक्यातील उणकेश्वर येथे असल्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यात ९ वाजून १२ मिनिटांनी हा धक्का जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. माहूर व किनवट तालुक्यातील अनेक गावात मोठा आवाज होऊन भूकंपाचा २० सेकंदाचा सौम्य धक्का ..

वारंगा ,डोंगरकडा, सुकळी, इजनी,आंबा चोंडी या भागात ही भूकंपाचा सौम्य धक्का  बसला आहे. ईवळेश्वर परिसरात भुकंपाचे धक्के  जाणवले त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण झाले.
फुलसावंगी ला पन झटका बसला. हिवरा व अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. अर्धापूर तालुक्यात ९ वाजून १२ मिनिटांनी हा धक्का जानवल्याचे नागरीक सांगत आहेत. नरसीतही काही सेकंद धक्का जाणवला. मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे भूकंपाचा धक्का बसला. .भूकंपाचे सौम्य धक्के
 नांदेडमध्ये आज रात्री भुकंपाचे धक्के बसले आहेत. भुकंपाची तीव्रता ३.९ रेक्टरस्केल असल्याचे सांगण्यात येत आहे. भुकंपामुळे नांदेड जिल्ह्यातील काही घरांच्या भितींना तडे गेले आहेत. भुकंपामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. यवतमाळमध्ये महागाव, उमरखेड तर नांदेडमध्ये किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भुकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच हिंगोली आणि अमरावती जिल्ह्यातही भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यातील अनेक तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का.टेभी मध्ये भिंत कोसळी.वानोळा,सारखनी,माडवी, परिसरात लोक रस्त्यावर आलेले आहेत. या भुकंपाचा केंद्र बिंदू किनवट तालुक्यातील उणकेश्वर येथे असल्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे. भुकंपामुळे नागरिकांनी घराबाहेरच झोपण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात पुन्हा भुकंपाचे धक्के बसू शकतात त्यामुळे या भागांना अलर्ट देण्यात आला आहे.