Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आता एसटी गळकी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याच बसमधूनच अधिकार्यांची ‘परेड’होईल : परिवहन मंत्री दिवाकर रावते



मुंबई // गळक्या छतांमुळे अंगावर पडणारे पाणी आणि त्यातूनच तासनतास होणारा एसटीचा प्रवास, पावसाळ्यात प्रवाशांना हा अनुभव काही नवीन नाही. मात्र आता एसटी गळकी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबीच रावते यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना सरकारी सुविधा व्यवस्थित मिळण्याकडे प्रशासनाचा कल दिसत आहे. पावसात एसटी आणि बसने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गळक्या छतांमुळे त्रास होतो. त्यावर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त जादा बस गाडय़ांविषयी एसटीची बैठक सोमवारी पुण्यात आयोजित केली होती. त्यावेळी गळक्या एसटी गाडय़ांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितला. तेव्हा सदर अधिकाऱ्यांनी एकही एसटीबस गळकी नाही असं सांगितलं. परंतू रविवारी राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पाऊस झाला. तेव्हा अनेक एसटी बस गाड्या गळक्या असल्याचे समोर आले. याबाबत रावते यांच्याकडे तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर रावते चिडले आणि एकही गळकी एसटी दिसल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्याच एसटीतून फेरफटका मारला जाईल, अशी तंबीच त्यांनी दिली. तसंच त्वरीत एसटीच्या छतांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त जादाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात एसटी महामंडळाच्या ३ हजार ७२४ जादा बसगाडय़ा सोडणार आहेत. तर १० जुलै ते १६ जुलैपर्यंत एसटीचे पाच हजार चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पंढरपूर येथे कार्यरत राहतील, अशी माहिती ही रावते यांनी यावेळी दिली.