Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

महागाईची झळ ! गॅस दरवाढीचा भडका ; घरगुती सिलिंडर पुन्हा महागला


मुंबई // सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस पण महागला आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली असून अनुदानित गॅस सिलिंडर १. २३ रुपयांनी महागला आहे.
आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एलपीजीच्या किमतीमध्ये झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने किमतीत वाढ झाली आहे.
दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये बदल केला जातो. यापूर्वी मे लाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे ला विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६ रुपयांची वाढ करण्यात आली होती तर अनुदानित गॅस सिलिंडर ०. २८ रुपयांनी महागला होता. २०१४ च्या तुलनेत अनुदानित गॅस सिलिंडर आता १०० रुपयांपेक्षा जास्त महागले आहेत. २०१४ मध्ये अनुदानित गॅसची किंमत ४१४ रुपये होती. महागाईची झळ सोसणाऱ्या ग्राहकांना आता गॅस सिलिंडरची दरवाढ सोसावी लागणार आहे.