Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सोसंल तेवढंच सोशल ! मायेची माणसं, अनेकांच्या जगण्याला आधार ! संधी सोशल मीडियामुळे मिळते आहे. आज 30 जून 'सोशल मीडिया डे 'आहे .



 @आपलं जगणं सहज अर्थपूर्ण करणारं
निखळ अर्थात नेट पॉझिटिव्ह असं सोशल मीडियानं काय दिलं,
असं शोधलं तर सापडतात

ज्यांनी तरुणांच्या जीवनात
अनेक रंग तर भरलेच
पण मायेची माणसं,
मानसिक आधार
आणि माहितीचा खुलेपणाही
सहज देऊन टाकला.

आरोग्यविषयक माहितीची देवाण-घेवाण
सोशल मीडियामुळे संवादाच्या, अनुभवाच्या अप्रत्यक्ष कक्षा विस्तारल्या आहेत. आपण जे अनुभव घेतलेले नाहीत ते अनुभव बघण्याची, वाचण्याची, समजून घेण्याची संधी सोशल मीडियामुळे मिळते आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियामुळे अनेक मनोशारीरिक आजारांची माहिती तरुण पिढीला समजू लागली आहे. मनोशारीरिक समस्या काय असतात, त्या हाताळायच्या कशा, इतर रुग्ण या समस्या कशा हाताळतात, मदत कुठे मिळू शकते अशा अनेक गोष्टींची माहिती आज सोशल मीडियामुळे सहज उपलब्ध आहे. यू-ट्युब सारख्या साइटवरून तर आजार, त्याच्या लक्षणांचे व्हिडीओ, डॉक्टरांशी थेट संवाद अशा अनेक गोष्टी आज उपलब्ध आहेत. इतकंच कशाला एखादं आॅपरेशन कसं केलं जातं याची माहिती हवी असेल तर त्याचे व्हिडीओज आज उपलब्ध आहेत. ज्यामुळे आरोग्य या विषयातले अज्ञान कमी व्हायला मदत मिळू शकते. विशेष म्हणजे अनेक आजारांसंदर्भात बोलण्याचा मोकळेपणा वाढतो आहे.

मानसिक आधार आणि कम्युनिटी बिल्डिंग
आपल्यापेक्षा वेगळे मत मांडणाºया व्यक्तीवर टोकाची असभ्य टीका सोशल मीडियात जशी होते तसाच अनेकांना मानसिक आधारही मिळतो. हा आधार जसा ओळखीच्या व्यक्तींकडून मिळतो तसा तो अनोळखी व्यक्तींकडूनही मिळतो. प्रत्यक्ष व्यक्तींना न भेटताही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मिळत असते. ही मदत समुपदेशन या स्वरूपाचीही असते किंवा नुसतेच ऐकून घेणे या स्वरूपाचीही असते. आजच्या काळात जिथे सोशल मीडियामुळे प्रत्येकाला मत मांडण्याचं प्रचंड स्वातंत्र्य मिळालं आहे तिथे कुणी कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. त्याच प्रमाणे याच माध्यमात फक्त ऐकून घेणारे, सल्ला देणारे, मानसिक आधार देणारे गट, व्यक्ती आणि संस्थाही आहेत. ही जमेची बाजू आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक १० तरु णांपैकी सात जण तरी समस्येच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागतात. किंवा त्यांना मदत मिळते असं अभ्यासात दिसून आलं आहे. त्यातून काही डिजिटल कुटुंबंही बनत आहेत. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ग्रुप्स असतात. अनेक कम्युनिटीज चालतात. या माध्यमातून समविचारी लोक एकत्र येतात. सपोर्ट सिस्टिम्स बनतात. एलजीबीटी लोकांचे गट, कॅन्सरच्या रु ग्णांच्या कुटुंबीयांचे, स्तनांचा कर्करोग झालेल्या स्त्रियांचे, निराशेशी लढणाºया स्त्री-पुरु षांचे गट ही एक सकारात्मक बाजू आहे.

स्वत:ला शोधायला हक्काची मदत
जसंजसं आपण तारु ण्यात पदार्पण करतो तशा अभिव्यक्ती आणि स्व-ओळख या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या बनतात. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक असतात. सोशल मीडियात व्यक्त होण्यावर बंधन राहत नाही. कुणी व्यक्त व्हावे आणि कुणी नाही या पारंपरिक भूमिका सोशल मीडियाने पूर्णपणे बदलून टाक