Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक ! पुण्यात भिंत कोसळून 16 जणांचा मृत्यू, 4 लहान मुलांचा समावेश


पुणे // इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यु झाला असून २ जणांना जिवंत काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस येथे घडलेल्या घटनेत.
मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.
यातील मृत्युंची नावे : आलोक शर्मा २८, मोहन शर्मा वय २०, अजय शर्मा वय १९, अभंग शर्मा १९, रवी शर्मा १९, लक्ष्मीकांत सहानी ३३, अवधेत सिंह ३२, सुनिल सिंग ३५, ओवीदास ६, सोनाली दास २ , विमा दास २८, संगीता देवी २६ अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व बिहार येथील मुळचे राहणारे आहेत.
ही इमारत उंचावर असून तिच्या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजुला खड्ड्यासारखी जमीन आहे. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड बनविण्यात आले होते.
पावसामुळे ही संरक्षक भिंत खचली व खाली असलेल्या लेबर कॅम्पवर पडली. दगडाची भिंत असल्याने त्याखाली पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले सर्व कामगार गाडले गेले.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. वरुन कोसणारा पाऊस, अंधार यामुळे मदत कार्यात अडथळा येत होता. सकाळी सात वाजेपर्यंत अग्निशामक दलाने १७ जणांचे मृतदेह बाहेर काढले होते. या ठिकाणचा एक कोपरा आता बाजूला करण्याचे बाकी होते. 