Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निश्चितच प्रगती साधल्या जाईल! सर्वांसाठी खुले असणाऱ्या शिबीरात विद्यार्थिनी सर्व प्रकारचे धडे घेतात ही गौरवाची बाब आहे--अधिकारीअश्विनी आपेट




महिला आत्मभान शिबीराचा समारोप


अंबाजोगाई   // मुलींना स्वतःची जडणघडण करून घेण्यासाठीची संधी अशा प्रकारच्या शिबीरातून निर्माण होते  यातून निश्चितच प्रगती साधल्या जाईल असे मत वनपरिक्षेत्रअधिकारी अश्विनीआपेट यांनी व्यक्त केले
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान शिबीराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते, व्यासपीठावर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कऱ्हाड, कार्यकारी उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, सचिव गणपत व्यास, सहसचिव एन.के. गोळेगांवकर,वाय.एच. राठोड, नायब तहसिलदार स्मिता बाहेती आदी उपस्थित होते
पुढे बोलताना आपेट म्हणाल्या की, सर्वांसाठी खुले असणाऱ्या शिबीरात विद्यार्थिनी सर्व प्रकारचे धडे घेतात ही गौरवाची बाब आहे  असे  सांगितले या प्रसंगी बोलताना बाहेती म्हणाल्या की, या शिबीराच्या माध्यमातून मुली शरीर व मनाने सुदृढ झाल्या  शिवाय स्वतःला कमजोर न समजता आपल्यातील सुप्त गुणांना विकसित करण्यासाठीच आत्मभान शिबीराची संकल्पना असून तो हेतु साध्य होवुन आज त्यातुन मुली घडत आहेत
अध्यक्षीय समारोपात डॉ. खुरसाळे म्हणाले की, पुर्वीपासून समाजाने महिलांना दुय्यम तऱ्हेची वागणूक दिली त्यांचे जीणे अवघड होते एका बाजुने ही अधोगतीच म्हणावी लागेल
आजच्या काळात महिला भयमुक्त व्हाव्यात तिने अन्यायाचा प्रतिकार करावा या उद्देशाने गेल्या बारा वर्षापुर्वी शिबीराची सुरू करण्यात आले आणि समाजाची मानसिकता बदलत आहे असे सांगितले विद्यार्थिनीनी मनोगत व्यक्त केले. उपास्थित पाहुण्यांचे स्वागत योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनीच्या सर्व सदस्यांनी केले
शिबीरातील प्रशिक्षक पिराजी कुसळे, चंद्रकात बलाढये, बापु सांळुके, अंकुश गायकवाड आदींचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला शिबीरार्थीनी उपस्थितांसमोर प्रात्यक्षिके दाखविली संस्था गीत गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला प्रबोधिनीच्या कार्याचे अहवाल वाचन शिबीरप्रमुख एम.बी. लोखंडे यांनी केले तर संचIलन संयुक्ता चौधरी, साधना ठोंबरे यांनी तर उपस्थितांचे आभार गायत्री रत्नपारखी हिने मानले या वेळी यो.शि.संस्थेचे पदाधिकारी,संचालक,विभाग प्रमुख,संस्थेच्या विवीध विभागातील कर्मचारी,शहरातील प्रतिष्ठीत,महिला,पुरुष पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
________________________