Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी शहरातून श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सवनिमित्त भव्य दिव्य व शिस्तीत मोठ्या थाटामाटात आदर्शाने निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली..!


 परळी  // महाविष्णू चे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्य दिव्य अशा शोभायात्रेत  परळी वैजनाथ येथे मोठ्या उत्साहात पार पडला या शोभायात्रेत ज्येष्ठ युवक-युवती  महिला  व लहान थोर असा सर्व समाज बांधव एकत्र येऊन या सोहळ्याची शोभा वाढवली.

परळी शहरातून मुख्य मार्गावर शांतता व शिस्तीच्या आदर्शाने निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय श्रीराम – जय परशुराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करून नागरीकांनी भगवान परशुरामाचे दर्शन घेतले. जुन्या गावभागात जागोजागी रांगोळी व महिलांनी भगवान परशुरामांचे
औक्षण करून दर्शन घेतले. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सकल ब्राह्मण समाज आयोजित भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.