औरंगाबाद,// परभणीचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांना उपसंचालक(माहिती) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा संचालक (माहिती), यशवंत भंडारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आज येथे सत्कार करण्यात आला.
येथील संचालक (माहिती) यांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, माहिती अधिकारी वंदना थोरात, सहायक संचालक प्रमोद धोंगडे, माहिती सहायक रेखा पालवे, आदींसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. भंडारे यांनी श्री. आलुरकर यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, उपस्थित अधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री. आलूरकर यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन लघुलेखक यशवंत सोनकांबळे यांनी केले. श्री. आलूरकर यांची पदोन्नतीने मुंबई येथील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक (प्रकाशने) या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. आज औरंगाबादचे सुपुत्र आणि सध्या रायगड येथे जिल्हा माहिती अधिकारी असलेले अनिरुध्द अष्टपुत्रे यांचीही उपसंचालक (माहिती) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दलही शुभेच्छा दिल्या. श्री.अष्टपुत्रे यांची नियुक्ती कोल्हापूर येथे करण्यात आली.
*********
Social Plugin