Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

● पाणी हे जीवन आहे !..स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक योगदान म्हणून मोफत पाणी वाटप करून तहानलेल्या पाणी ..देऊन मोठा धीर दिला जात आहे.●



परळी वैजनाथ //  येथील स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावभागात दोन महिन्यांपासून  जुन्या परळी गावभागात  मोफत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीच्या भीषण  दुष्काळी परिस्थितीत सेवा उपक्रमाद्वारे  सामाजिक योगदान देण्याच्या या उपक्रमाचा नागरीकांना मोठा धीर मिळत आहे.
     
 मागील काही दिवसांपासुन शहरात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना पाणी मिळत नाही विशेषतः जुन्या गावभागात मोठी पाणी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतत सामाजिक कार्यात अग्रेसर  असलेल्या स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावभागात दोन महिन्यांपासून जिथे आवश्यकता आहे अशा ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दिवसभरात अविरतपणे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.जनतेला घराजवळ पाणी मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ट्रस्टनेमागच्या दोन वर्षांपूर्वीपासून दुष्काळी परिस्थितीत अशाच पध्दतीने टँकरने मोफत पाणी पुरवठा केला होता.
@@@
*सामाजिक दायित्व पालनाचा प्रयत्न - बाजीराव धर्माधिकारी*
       दरम्यान नेहमीच विविध माध्यमातून सामाजिक दायित्व पालनाचा प्रयत्न आहे. भीषण  पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्वांनी मिळून सामना करणे काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने  आमच्या ट्रस्ट च्या माध्यमातून जुन्या गाव भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या सुसह्य करण्याचा प्रयत्न आहे.गरजेनुसार आणखी एक टॅकर वाढवून पाणी पुरवठा करण्यात येणार  असल्याचे या ट्रस्टचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.