Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

थेट नागापूर धरणात पोहोचले ! परळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी नागापूर वाण धरणाची सध्या पाण्याची काय परिस्थितीची पाहाणीसाठी...






@ नागापुर वाण धरणाची गणेश महाडिका व कर्मचारी कडुन पाहणी


परळी // नागापूर वाण धरणावरील आजची पाणी परिस्थिती भयानक बिकट आहे.पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे अश्या परिस्थितीत प्रशासना कडुन काय उपाययोजना करता येतील का किंवा धरणात सध्याच्या पाण्याची काय परिस्थिती काय आहे. ही पाहणी
करण्यासाठी आज
 परळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक  , नाराब तहसीलदाला बी एल रूपनर ,   वाण धारण मुख्य अभियंता शिंदे ,नप जाधव साहेब, पंचायत समिती रोडे ,यांनी धरणावर भेट दिली.व उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,नायब तहसीलदार रुपनर व सहकारी कर्मचारी यांनी  पाहणी केली.

पाण्यासाठी संपूर्ण परळी तालुका तळमळतोय ना धरणात, ना विहिरीत ना बोअरला पाणी , केवळ वाण धरणावर अवलंबून असलेली परळीचा पाणीपुरवठा दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे परळीकरांवर पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन अश्या परिस्थितीत प्रशासना कडुन काय उपाययोजना करता येतील का किंवा धरणात सध्याच्या पाण्याची काय परिस्थिती काय आहे याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून परळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी थेट नागापूर धरणात पोहोचले