Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात ! धारूर घाटात भरधाव ट्रॅव्हल्सचालकाचा ताबा सुटल्यामुळे , ट्रॅव्हल्स पलटी होऊन एक ठार



बीड//  उदगीर हुन औरंगाबादला जाणारी हमसफर ट्रॅव्हल्स ( गाडी क्र.MH-20-W-9906) जिल्ह्यातील धारूर घाटात पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून 21 प्रवासी  जखमी झाले आहेत .ही घटना रात्री 2/3 वाजण्याच्या सुमारास घडली.

या बसमध्ये एकूण 36 प्रवाशी होते. ट्रॅव्हल्स मधील ज्योती नावाची महिला वय अंदाजे 60 वर्ष या जखमी महिलेस अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला ,यामध्ये 05 जणांना फ्रॅक्चर झालेले असून एकूण 16 लोकांना उपचार करून घरी  पाठविण्यात आले आहे .इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत.