अंबाजोगाई // महिलांनी आपली बुद्धीमत्ता सिध्द केली असून सर्वच क्षेत्र काबीज करणाऱ्या महिलांनी सर्वार्थाने सक्षम बनुन सर्व संकटाचा सामना धैर्याने केला पाहीजे असे मत केज येथील प्रसिद्ध समाजसेविका सीता बनसोड यांनी व्यक्त केले
येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान शिबीरात त्या बोलत होत्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव एस.के. बेळुर्गीकर होते
पुढे बोलताना बनसोड म्हणाल्या की, महिला राष्ट्राच्या आधारस्तंभ आहेत तरी त्यांना कमी लेखले जाते समाजात मुक्तपणे जगु दिले जात नाही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा विषय आवडीने चघळला जातो त्यांना दुय्यम स्थान दिले जाते हे बदलण्याची गरज असून विपरीत संस्कृतीचा परिणाम आजच्या समाजावर झाला असून युवती आणि महिलांनी त्यास बळी पडू नये कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची कुवत कमी होत चालली असून युवतीनी बालविवाह, हुंडा बंदी अशा विघातक गोष्टीला प्रखर विरोध केला पाहीजे असे सांगुन त्यांनी शिबीराथींनी विचारलेल्या प्रश्नास समर्पक उत्तरे दिली
अध्यक्षीय समारोपात बोलताना बेळुर्गीकर म्हणाले की, महिलांमध्ये मोठी शक्ती असून त्या परिस्थितीला जुळवुन समर्थपणे जगले तर जीवन सुखी होईल योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत सहमुख्याध्यापिका एम.एस. कुलकर्णी यांनी केले
कार्यक्रमाचे संचालन दृष्टी चव्हाण हिने तर स्नेहल तपसे हिने उपस्थितांचे आभार मानले
या कार्यक्रमास योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक, विविध विभागाचे प्रमुख, इतर कर्मचारी, क्रिडा प्रबोधिनीचे सदस्य, शिबीरार्थी मोठया संख्येने उपस्थित होते
Social Plugin