Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक !संतापजनक !! परळीत एका 6 वर्षाच्या मुलीवर 55 वर्षाच्या वयोवृद्धांनी केला अत्याचार ... .वैद्यकिय तपासणीनंतरच विनयभंगाचा गुन्हा दाखल




 परळी //  सहा वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना परळीत आज सकाळी उघडकीस आली आहे.
शहरातील संभाजी नगर पोलिस ठाणे हद्दीत घडला गुन्हा पिडित 'मुलीला उपजिल्हा रूग्णालयात दाखल  करण्यात आले असून  तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली त्यानुसार आरोपी विरोधात विनयभंगाचा गून्हा दाखल झाला आहे .

परळी शहरातील संभाजी नगर पोलिसठाणे हद्दीत सहा वर्षीय मुलीवर ५५वर्षीय नराधमाने जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडलीआहे.आज सकाळी पिडित मुलीने याबाबतची माहिती
कुटुंबियांना दिल्यानंतर हा प्रकार
'उघडकीस आला. त्यानंतर तिला
'तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात
'वैद्यकिय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकिय अधिकारी यांच्या अहवाल नंतर विनयभंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पिडीत मुलीची आई  परळीत नसल्याने दुपारी उशिरापर्यंत तपासणी झाली
नव्हती. संभाजी नगर ठाण्याचे पोलिस दुपारी उशिरापर्यंत रूग्णालयात थांबवून होते.वैद्यकिय तपासणीनंतर त्यांनी  गु र कलम 354 ,363 नुसार छेडछाडा व बाललैगिंक अत्याचार , विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे .