प्रतिकात्मकफोटो
बीड // सध्या सर्वत्र पाणीटंचाई आहे. नागरिक पाण्यासाठी धावाधाव करीत आहेत. चिंचाळा येथेही यापेक्षा वेगळी परस्थिती नाही. वडवणी येथे पाण्याचा ड्रम ठेवलेली बैलगाडी अचानक समोरून उलटली. या गाडीखाली दबून जयदेव (वय ८) व अविष्कार बळीराम राठोड (वय ५) अशी मयत भावंडांची नावे आहेत. भावंडांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सोमवारी बळीराम राठोड यांनी शेतातून पाण्याचा ड्रम भरून बैलगाडीत आणला. सायंकाळच्या सुमारास बैलगाडी घरासमोर सोडली आणि ते बैल बांधण्यासाठी गोठ्यात गेले. याचवेळी ही दोन्ही मुले गाडीजवळ आले. मागच्या बाजुने दोघेही गाडीला लोंबकळले. अचानक गाडीच्या दांड्या वर झाल्या आणि हे दोघेही मागच्या बाजूने दबले गेले. गाडीत दोन मोठ्या टाक्या असल्याने त्यांना ओरडताही आले नाही. हा प्रकार या मुलांच्या आईने पाहिला. ओरडत ती गाडीजवळ आली. मात्र पाणी असल्याने तिला काहीच करता आले नाही. मोठा आवाज आल्याने तांड्यावरील सर्व लोक जमा झाले आणि या दोघांना बाजूला काढत रूग्णालयात हलविले. मात्र गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही रस्त्यातच मृत्यू झाला होता
Social Plugin