Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांसाठी एक लग्नपञिका बनली जिव्हाळ्याची !! परळी येथून जाणाऱ्या रेल्वेचे दैनंदिन संपुर्ण वेळापञक पाहिजे तर ...




 परळी येथून जाणाऱ्या  रेल्वेचे दैनंदिन वेळापञक ठरले या लग्न पञिकेचे विशेष आकर्षण .....!
@ परळी येथील भेंडेकर परिवाराचे लग्नपत्रिकेतून समाज प्रबोधन 



परळी // सध्या सगळीकडे लग्नसराईचा सोहळा सुरु आहे. सर्वत्र लग्नाची धुमधाम सुरु आहे. सगे सोयरे आप्तेष्ट यांना लग्नाला आमंञित  करण्यासाठी लग्न पत्रिका छापणे अनिवार्यच असते.

लग्नाच्या आमंत्रणासाठी आजच्या फॅन्सी दुनियेत फॅन्सिबल लग्न पत्रिका छापण्यात येत आहे. लग्न पत्रिका ही सर्वाच्या हातात पडत असल्याने ती एक समाज प्रबोधनासाठी महत्त्वाचा माध्यम ठरु शकतो. ही गरज ओळखुन परळी  येथील भेडेंकर परिवारने लग्न पत्रिकेच्या माध्यमातून सर्वाना सतत उपयोगी पडणारे
@परळी येथून जाणाऱ्या  रेल्वेचे दैनंदिन वेळापञक या लग्न पञिकेचे विशेष आकर्षण ठरले आहे . तसेच  समाज प्रबोधनपर संदेश दिला आहे .

@झाडे लावा झाडे जगवा

मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जात असल्याने त्यांचा विपरीत परिणाम सध्याच्या वातावरणात जाणवत आहे. वृक्ष लागवड वाढल्याने तापमानात वाढ होणे, अवेळी पाऊस येणे, आम्ल पजर्ण आदी होत असतांना दिसत आहे. वृक्ष लागवड करणे यावर एकमेव उपाय असल्याने शासनाने वृक्ष लागवडीसाठी मोहिम हाती घेतले आहे. परंतु शासनाने प्रयत्न करुन काही होणार नसुन प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आरती आणि उत्तमयांच्या  लग्न पत्रिकेत झाडे लावा झाडे जगविण्यासाठी समाज जनजागृतीपर संदेश देण्यात आले आहे.