Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अन गुरुजी झाले विद्यार्थी .... सर्व शिक्षक प्राध्यापकांची भरली शाळा ..! कार्यशाळात शिंदे गुरुजीनी घेतली अनेकांची हाजरी.




अंबाजोगाई//  अंबाजोगाई गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शिक्षक प्राध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा दिनांक २४ रोजी येथील योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करुन सुरुवात करण्यात आली.
 अंबाजोगाई गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिक्षक व प्राध्यापकांची कार्यशाळा ( सहविचार सभा )  बुधवारी दि. २४ भरविण्यात आली. ही कार्यशाळा शहरातील योगेश्वरी विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. आयोजित कार्यशाळेमध्ये शिक्षक व प्राध्यापकांच्या अधिकारांची व कर्तव्यांची माहिती गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सविस्तरपणे  विषद केली. उपस्थित सर्व अध्यापकांनी या कार्यशाळेत बद्दल समाधान व्यक्त केले.

 या कार्यशाळेमध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अंदाजे दोनशे शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक या सर्वांची उपस्थिती अनिवार्य होती. घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये गोपनीय अहवालाबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. गोपनीय अहवाल बाबतचे उद्दिष्टे, सुप्त गुणांना वाव, अभिलेख यांचा कालावधी, कार्यकालाविषयी टिपणी ,  खंडित काळाचा अभिलेख, पुनर्विलोकन अधिकाऱ्यांची निवृत्ती, नातेवाईकांचा अभिलेख, अभिलेख कसा लिहावा , अभिलेख लिहिणे व प्रति स्वाक्षरीत करणे, गोपनीय अभिलेखातील मजकूर ,स्वंय मूल्यमापनाची पद्धत, प्रतिकूल अभिप्राय कळवणे, सर्वसाधारण, प्रतिकूल अभिप्राय याविरुद्ध अभिवेदन, गोपनीय अभिलेखाचे जतन, प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्याचे अभिलेख, प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे अभिलेख, मागासवर्गीयांचे अभिलेख, प्रामाणिकपणाच्या सांशकते बाबतची नोंद, गोपनीय अभिलेखावर अपील , सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल लिहून घेणे इत्यादी विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे उपस्थित शिक्षक प्राध्यापकांकडून गोपनीय अहवाल लिहून घेण्यात आला. आयोजित कार्यशाळेमुळे अधिकारी, शिक्षक, प्राध्यापकांना, आपल्या अधिकारांबाबत व कर्तव्यांबाबत सखोल माहिती प्राप्त झाली. ही कार्यशाळा तब्बल साडेचार तास सुरू होती.