Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

गेवराई पोलीस स्टेशन समोरच चोरट्यांनी एकाचा केला निर्घृण खून तर अंबाजोगाईतअवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले;


अंबाजोगाई राज्य उत्पादन शुल्क  विभागाची ही तिसरी मोठी कारवाई 


अंबाजोगाई //   येथील चनई तांडा शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर सोमवार,दि.1 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

 अंबाजोगाई येथील चनई तांडा शिवारात व परिसरात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.यात दारू तयार करण्याचे प्लास्टीक टाकीत भरलेले एक 500 लिटर रसायन,200 लिटरचे 16 लोखंडी बॅरल,50 लिटरचे दोन प्लॅस्टीक कॅन यासह एकुण मिळून सुमारे 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच तात्काळ नष्ट करण्यात आला.या प्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.गेल्या दोन महिन्यात निरिक्षक अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाने ही तिसरी मोठी कारवाई केली आहे.गेल्या दोन महिन्यात अंदाजे सहा ते सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या कार्यालयास यश मिळाले आहे.
त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.1 एप्रिल सेामवार रोजी करण्यात आलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड,कॉन्स्टेबल बि.के.पाटील व वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

गेवराई पोलीस स्टेशन समोरच  चोरट्यांनी एकाचा केला निर्घृण खून

 गेवराई // गेवराई शहरातील खक्का मार्केट भागात राहणाऱ्या एका शर्मा नावाच्या कुटुंबाच्या घरी पहाटे अज्ञात चोरट्यानी चोरी केली,यावेळी घरात असलेल्या एका महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने तोडून घेत मोबाईल चार्जरच्या साहाय्याने तिचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला .

गेवराई पोलीस स्टेशन समोरच असलेल्या या खक्का मार्केटमध्ये पहाटे पहाटे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत .