Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

'या' गाण्याने युट्युबवर चांगलंच धुमाकूळ घातला..आतापर्यंत 136,260,640 लोकांनी पाहिलं


मुंबई // सध्या एक गाणं युट्युबवर चांगलंच धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 136,260,640 लोकांनी पाहिलं आहे. तर 50 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. किल दिस लव्ह (Kill This Love) असं या गाण्याचं नाव आहे. दक्षिण कोरियातील पॉप बँड ब्लॅकपिंक च्या कलाकरांनी हे गाणं तयार केलं आहे. जेव्हा गंगनम स्टाईल हे गाणं रिलीज झालं होतं तेव्हा त्या गाण्यानेही युट्युबवर धुमाकूळ घातला होता.

परंतु या नव्या गाण्याने तर आता गंगनम स्टाईल या गाण्याचेही रेकॉर्ड तोडले आहेत. तरुणांना या गाण्याचं इतकं वेड लागलं होतं की त्यांनी त्यावर डान्स केलेले आपापले व्हिडीओ युट्युबवर अपलोड केले होते. हे गाणं अजूनही चांगलंच फेमस आहे. किल दिस लव्हने गंगनम स्टाईलचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

हे गाणं केवळ 3.10 मिनिटांचं आहे. हे गाणं तुम्ही पाहिलत तर तुम्हीदेखील या गाण्याच्या प्रेमात पडाल. रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासून हे गाणं प्रेक्षकांच्या मनात आणि ओठावर दिसत आहे. दक्षिण कोरियाई बँड ब्लॅकपिंक हा केवळ महिलांचा बँड आहे. 2016 साली केलेल्या सक्वाय वन या अल्बमपासून या बँडने सुरुवात केली होती.