ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण
परळी // 39 बीड लोकसभा मतदार संघ
233 परळी विधानसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांना आज आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत कर्मचारी यांना प्रशिक्षण व मनात असलेल्या शंका दूर करण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालय परळी वै येथे आज बुधवारी दि 27/03/2019 सकाळी 9 वाजल्यापासून तहसील कार्यालयामार्फत कर्मचारी यांना प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यास सुरू झाले आहे .
कर्मचार्यांना evm, व vvpat हाताळणी आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान कसे घ्यावे याबाबत प्रशिक्षण आदी बाबतीत माहिती दिली जात आहे .
व्हीव्हीपॅट हे प्रिंटरप्रमाणे काम करणार आहे. मतदान कक्षामध्ये बॅलेट युनिटसोबत व्हीव्हीपॅट जोडले राहील. मतदार जेव्हा मतदान करतील तेव्हा व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनमध्ये सात सेकंदापर्यंत पेपरस्लीप डिस्प्ले होईल. अशाप्रकारे व्हीव्हीपॅटमुळे ज्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याच उमेदवाराला मत पडले आहे, याची खात्री मतदार करू शकतो.
आगामी लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनबाबत मनात असलेल्या शंका अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने व निवडणूक व्यवस्था सुरळीत पारपडाण्यासाठी परळी तहसील कार्यालयामार्फत कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यास सुरूवात झाली असून यात सहभागी एकूण कर्मचारी 1647
सेक्टर ऑफिसर 36 व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश महाडिक, व तहसीलदार डॉ विपीन पाटील न प मुख्यधिकारी अरविंद मुंडे गटविकास अधिकारी लोंखडे आदी उपस्थित आहेत .
Social Plugin