अंबाजोगाई ( प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने
मराठी विषयात संशोधन केल्याबद्दल
येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षिका वंदना बालटकर यांना पीएच.डी. प्रदान केली .
वंदना बालटकर यांनी ' साठोत्तरी मराठी कादंबरीतील सामाजिक व आर्थिक बदलाचे चित्र - एक अभ्यास ' या विषयावर संशोधन केले . त्यांना सोनपेठ येथील प्रा.डॉ. सा .द. सोनसळे यांनी मार्गदर्शन केले .
योगेश्वरी नूतन विद्यालयातील सहशिक्षिका वंदना बालटकर यांना पीएच.डी. प्रदान केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे , अॅड .शिवाजीराव कराड ,
कमलाकर चौसाळकर , गणपत व्यास , प्रा . माणिकराव लोमटे , मुख्याध्यापिका कुंदा व्यास व आदीं त्यांचे आभिनंदन केले .
Social Plugin