अंबाजोगाईत स्वच्छतेचा महाजागर !! केवळ चार तासात ८५० टन कचरा शहराबाहेर फेकण्याची अनोखी किमया
▪ १२ हजार स्वयंसेवकांनी महास्वच्छता अभियान राबवून ८५० टन कचरा टाकला शहराबाहेर
▪ १५० ट्रॅक्टर, ६० घंटागाडया व १० जेसीबी मशीन्स स्वच्छतेच्या कामी
▪ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व अंबाजोगाई नगर परिषदेचा संयुक्त उपक्रम
▪ अंबाजोगाईतील विविध सामाजिक संस्थांचांही अभियानात पुढाकार
अंबाजोगाई // ते आले, त्यांनी पाहिलं, अन् हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाला सुरुवात केली. शहरातील असा कोणताही भाग राहिला नाही तिथं झाडू पोहचला नाही. १२ हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक रविवारी अंबाजोगाईत झालेल्या महास्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. केवळ चार तासात ८५० टन कचरा शहराबाहेर फेकण्याची अनोखी किमया या माध्यमातून साध्य झाली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व नगर परिषद अंबाजोगाई यांच्या वतीने रविवारी अंबाजोगाईत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेतून लोकजागर हा महामंत्र डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिला व त्यांचा हा मौलिक संदेश राबविण्यासाठी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शिष्य मंडळींनी अंबाजोगाईत धाव घेतली. सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी चौकातून महाअभियानास प्रारंभ झाला. शहरातील प्रत्येक भागात स्वच्छता स्वयंसेवकांनी केली. नाल्या, तुंबलेली गटारे, जयवंती नदीचे पात्र, बसस्थानक, रुग्णालय परिसर, योगेश्वरी मंदिर परिसर, अशा सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून शहरातील चौक, आकर्षक रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला. हे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने १५० ट्रॅक्टर, ६० घंटागाडया व १० जेसीबी मशीन्स स्वच्छतेच्या कामी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. १५० ट्रॅक्टरही कचरा वाहून नेण्याचे काम सातत्याने करत होते. या स्वच्छता अभियानात अनेक अपंग, मूकबधीर, महिला, यांच्यासह अनेक अधिकारी,कंत्राटदार यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. कोणीही कसलीही सूचना न देता प्रत्येकाची स्वच्छतेचे काम हाती पडेल त्या पद्धतीने शिस्तीत सुरू होते. १०.३० वाजेपर्यंत ८५० टन कचरा शहराबाहेर गेला व अंबाजोगाईचा परिसरा चककाला.या अभियानासाठी सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद, लातूर व विविध ठिकाणांहून १२ हजार श्रीसदस्य आपल्या विविध वाहनांद्वारे अंबाजोगाईत दाखल झाले होते. त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने हातमोजे, झाडू, मास्क आदि साहित्य पुरवण्यात आले.
या स्वच्छता अभियानाचा समारोप वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. यावेळी आ. प्रा. संगिता ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, मुख्याधिकारी सुधाकर जगताप, विकास जामदार यांची भाषणे झाली. यावेळी अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या लोककार्याचा गौरव करण्यात आला. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
▪ अंबाजोगाईत पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा होणार नागरी सत्कार :
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली जशी शहराची स्वच्छता झाली. तशी मनाची स्वच्छता करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे यावेळी नगर परिषदेचे गटनेते राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
▪ या संस्थांचा होता अभियानात सहभाग :*
अंबाजोगाईत झालेल्या महास्वच्छता अभियानात अंबाजोगाई शहरातील विविध संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यात रोटरी क्लब आॅफ अंबाजोगाई सिटी, भारतीय जैन संघटना, वकील संघ, डॉक्टर संघ, पत्रकार संघ, योगेश्वरी शिक्षण संस्था, राष्ट्रीय छात्रसेना, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई पिपल्स बँक, मानवलोक, व्यापारी संघटना यांच्यासह विविध संघटनांचा सहभाग होता.
===========================
अधिक बातम्यांसाठी वाचा दै‘विवेक सिंधु’
Social Plugin