पुणे // प्रेयसीचा खून करुन प्रियकर फरार झाला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खून करण्यात आलेली मुलगी चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती.
सोनाली भिंगार दिवे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सोमेश घोडके हा फरार झाला आहे. सोनाली ही अभियांत्रीकीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती.
सोनाली दिवे ही पुण्यातील झील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होती. सोनाली हीने कॉलेजजवळ नुकतीच एक खोली भाड्याने घेतली होती. या खोलीमध्ये संशयित सोमेश घोडके व सोनाली एकत्र राहत होते. दरम्यान या दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने सोनालीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर सोमेशने चिठ्ठी लिहून ठवली आहे. त्यामध्ये मी मी स्वतः ही आत्महत्या करणार असल्याचे त्यात त्याने नमूद केले आहे.
मृतदेह कुजला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनालीचा खून साधरणत: तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.
Social Plugin