Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

नात्यातील सुरेल संवादासाठी ,जोडीदाराची विवेकी निवड व निवडीत मेळ लग्नाचा..!!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित  .
अंबाजोगाई // लग्न जुळवायचे  म्हणजे फोटो, पत्रिका, मध्यस्थ  आलेच पत्रिकेतल्या गुणाचा मेळ लागला तरी मनं जुळतील याची खात्री नाही, मग काय करायचं ? पालकांची चिंता,  तरुणांना लग्नाबाबत वाटणारी भीती..दोन्हीचा मेळ साधण्यासाठी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंबाजोगाई आयोजित जोडीदाराची विवेकी निवड ' या उपक्रमाव्दारे संवाद मनोमिलनाचा पालक आणि मुला-मुलींसोबत "सहजीवन"  या विषयाशी संबंधित  हा एक आगळा वेगळा उपक्रम.. आपल्या मित्र-मैत्रिणी, पालक सर्वांसाठी निःशुल्क संवाद ,निःशुल्क सहभाग आपल्यासाठी .... जोडीदाराचे स्थान आयुष्यात महत्त्वाचे असताना कधी कोणाचे तरी मन राखण्यासाठी, कधी आकर्षणातून, दबावातून निर्णय घेतले जातात. पालकही मुलांच्या अपेक्षा, स्वप्न समजून घेऊन निर्णय करतातच असे नाही, हे सर्व टाळण्यासाठी एका व्यापक संवादाची गरज आहे. त्यातूनच जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम पुढे आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देत , सहकार्य करीत . हे करताना अनेकदा जाणवत होते की, मुलांनी घेतलेले निर्णय सर्वांगीण विचार करून घेतलेले असतातच असे नाही. त्यामुळे निवडीसंदर्भात विचार करायला लावणे, दिशा देणे आवश्यक असते. सर्वांसाठी निःशुल्क संवाद ,
निःशुल्क सहभाग
सोशल मीडियावर मुलींच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत, त्या कशा चुकीच्या आहेत, मुली कशा अविचारी अपेक्षा ठेवतात, त्यामुळे त्यांचे लग्नाचे वय जास्त वाढत आहे, अशा एकतर्फी मांडणीचे मेसेज फिरत असतात. तसेच लग्नानंतर मुले बायकोच्या सांगण्याने कशी बिघडतात, आई-वडिलांना कशी विसरतात, मुलीच्या आईच्या हस्तक्षेपाने संसार कसे मोडतात, असे मेसेजही पसरवले जात असतात.
वैवाहिक जीवन, त्यातून येणारे नातेसंबंध यामध्ये समस्या निर्माण होतात, परंतु प्रत्येकाच्या बाबतीत हे घडते का? कारणे फक्त मुलींशीच निगडीत आहेत का? याअनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवक-युवतींसोबत काम केल्यावर जाणवले की, जोडीदाराच्या निवड प्रक्रियेत फारसा संवाद आणि मोकळेपणा नसतो.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंबाजोगाई आयोजित
म. गांधी अध्यासन केंद्र , SRT कॉलेज, अंबाजोगाई येथे 9 फेब्रुवारी 2019 दु. 2 ते 4 यावेळेत नागापूरकर सभागृह, योगेश्वरी विज्ञान  महाविद्यालय, अंबाजोगाई.येथे  ‘जोडीदाराची विवेकी निवड ' पालक आणि मुला-मुलींसोबत "सहजीवन"  या विषयाशी संबंधित  हा एक आगळा वेगळा उपक्रम.. आपल्या मित्र-मैत्रिणी, पालक सर्वांसाठी निःशुल्क संवाद ,निःशुल्क सहभाग
अधिक माहिती व पूर्वनोंदणी साठी संपर्क:-
प्रा शैलजा बरूरे - 9423714534
हेमंत धानोरकर - 9960096062
कृष्णा अाघाव - 9975760905