Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कॉलेजला निघालेल्या तरुणीला स्कूलबसची लिफ्ट मागणे जीवावर बेतले .



उदगीर // गावापासून मुख्य रस्त्यावर आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस खड्यात जावून उलटली झाली. त्यात या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कॉलेजला निघालेल्या तरुणीला स्कूलबसची लिफ्ट मागणे जीवावर बेतले आहे. उदगीर येथील मादलापुर रोडवरील दत्तनगर भागातील आदित्य इंग्लिश स्कुलची बस उलटून झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा जागीच मृत्यु झाला आहे. हा अपघात आज सोमवार सकाळीच्या वेळी  झाला.

या बाबत मिळालेली माहीती अशी की, आदित्या इंग्लिश  स्कुलची स्कुलबस एमएच १२ एफ सी ३२२१ शाळेची मुले आणण्यासाठी उदगीरहुन अवलकोंडा गावात गेली होती. तेथील मुले घेवुन उदगीरला निघाली असता, उदगीरच्या शिवाजी महावियालयात बी.ए. च्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या प्रियंका व्यंकट बोईनवाड (वय १९)  रा.अवलकोंडा या विद्यार्थिनीने बसला हात दाखवून लिफ्ट मागितली. गावातीलच असल्यामुळे बसचालक मारोती गुडसुरे यांनी तिला लिफ्ट दिली.

या गाडीत असलेले इतर २० ते २५ बालक किरकोळ जखमी असल्याची माहीती पोलीसांनी दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलीस जमादार नामदेव सारुळे व चंदकांत कलमे यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होवून घटनेची माहीती घेतली.या तरुणीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सामान्य रुग्नालयात आणण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.