भक्तीमय वातावरणात भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शिस्तबद्ध व शानदार शोभायात्रा
परळी //भारत विजय यात्रेनिमित्त रविवार 3 फेब्रुवारी रोजी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत
सनातन हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य पद असणार्या आद्य शंकराचार्य संस्थापित चार मुख्य पीठांपैकी शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू प. प. श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी हे या निमित्ताने वैद्यनाथाच्या पावनभूमीत श्रृंगेरीपीठाधिश शंकराचार्यांचे मंगलमयी शोभायात्रेने दैवी स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांसाठी मंदिराचे पूर्व महाद्वार उघडण्यात आले होते. तसेच महास्वामीजींनी वैद्यनाथास निजलिंग स्वरुपात वेदोक्त महाअभिषेक केला.
सकाळी महास्वामीजींचे शहरात आगमन होताच लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथून वैद्यनाथ मंदिर पर्यंत रथारूढ व मंगल वाद्यांच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. गुरूभक्ती – लोकशक्ती संगमाने शानदार शोभायात्रा अतिशय मंत्रून टाकणाऱ्या धार्मिक वातावरणात पार पडली. प.प.शंकराचार्यांच्या पावन सानिध्याचा व अशिर्वचनाचा भाविक व धर्मप्रेमी मंडळींना लाभ मिळाला.भक्तीमय वातावरण, विविध प्रकारचे मंगलवाद्ये, भजनी मंडळी, व भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाची शिस्तबद्ध व शानदार शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा सवाद्य व सजवलेल्या रथारूढ महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात विद्वतजन, पुरोहित ब्रह्मवृंद,महिला,भजनी मंडळी, गोंधळी पथक, वासुदेव पथक, शिष्यवृंद, व जयघोषात प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत वैद्यनाथ मंदिर पूर्व महाद्वारात पोहचली.
प. प. शंकराचार्य महास्वामीजींच्या हस्ते वैद्यनाथास कवचविरहित निजलींग रुपास वेदोक्त महाअभिषेक करण्यात आला. विधीपुर्वक व जनकल्याणार्थ संकल्प करत वैद्यनाथास आवाहन करण्यात आले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सचिव राजेश देशमुख, विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा.बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू,अनिल तांदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथ देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, बाळू पुजारी आदींनी परंपरेप्रमाणे महास्वामीजींचा सत्कार केला. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजा मुंडे यांनी शंकराचार्यांचे स्वागत केले तसेच शोभायात्रेत ही त्या सहभागी झाल्या.वैद्यनाथ मंदिरापर्यंत निघालेल्या शोभायात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या.यावेळी आमदार संगीता ठोंबरे,दत्तापा ईटके,विकास डुबे,राजाभाऊ दहिवाळ, प्रकाश जोशी,वासुदेव पाठक,राजेंद्र ओझा,दत्ता कुलकर्णी,पवन मुंडे,नितीन ढाकणे,नितीन समशेट्टी,आश्वीन मोगरकर,गोविंद मोहेकर,सचिन गित्ते,मोहन जोशी आदि उपस्थित होते.
Social Plugin