Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ना.धनंजय मुंडे यांच्याहस्ते शंकरअप्पा मोगरकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त कृतज्ञता गौरव!


परळी वैजनाथ // शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा आदर्श शिक्षक,माजी नगरसेवक शंकरअप्पा मोगरकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त तसेच पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने आयोजित जेष्ठ नागरीक कृतज्ञता गौरवाचे औचित्य साधून आज राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते  कृतज्ञता गौरवपत्र देउन सत्कार करण्यात आला.
        पद्मविभूषण खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठांचा कृतज्ञता गौरवपत्र देवुन सन्मान केला जात आहे. या उपक्रमाचा भाग तसेच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ऋषीतुल्य ज्येष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,जि. प.सदस्य प्रा.डॉ. मधुकर आघाव ,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,माणिक भाऊ फड,अनंत ईंगळे, शंकर कापसे, यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.