Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते सोमवारी श्री. रेणुका माता मंदिरचे भूमिपूजन !

**
परळी वैजनाथ//
          राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या शुभास्ते आज दि. 7 रोजी गोंधळी समाज बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृह व श्री रेणुका माता मंदिरचे भूमिपूजन होणार आहे.     
           सोमवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता बसवेश्वर कॉलनी च्या पुढे रेणुका नगर येथील निर्माण होत असलेल्या रेणुका माता मंदिर व  गोंधळी समाज सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. सरोजिनी हलगे ,माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीरावभैया धर्माधिकारी,  न.प. गटनेते वाल्मीक कराड, नगरसेवक शरद मुंडे, जि. प. सदस्य बबन फड ,उपनगराध्यक्ष आयुब पठाण आदी  मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
    या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोंधळी समाज संघटनेचे अध्यक्ष जगदीश इंगवे,  उपाध्यक्ष दत्तात्रय दुंदुले,  सचिव राहुल इगवे ,योगेश वांजरखेडे, राजेश भंडारी, चंदे सर ,चौधरीसर, भोसले सर, मचाले सर, महारुद्र काळे, बिबीशन काळे, अभी गुट्टे,  भरत सोमवंशी, श्याम परदेशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक मुक्तार शेख, लक्ष्मण तात्या भिलारे, पप्पू जगदाळे, दीपक सुपलकर ,वैजनाथ घोटकर, परमेश्वर काळे, किशोर काळे, चंदू ढवळे, पल्ले काका, रामेश्वर जाधव ,चंद्रकांत ढवळे,  शिवा जाधव, नरसिंह मिरगे, आकाश धुमाळ, नरसिंह आगलावे, शुभम शिंदे, रामेश्वर काळे, सतीश घोटकर, अमोल गंगावणे, गणेश भंडारे, महेश दाडगे, ईश्वर ढवळे, संदीप काळे, सचिन भांडे, केदार धुमाळ, अमोल भांडे व सर्व रेणुका नगर भागातील रहिवाशांनी केली आहे.